Home महाराष्ट्र गंगाखेड येथे नामदार रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

गंगाखेड येथे नामदार रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

83

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.16मार्च):- येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ व जिवाजी ब्रिगेडच्या तालुका व शहर शाखेच्या वतीने नामदार रावसाहेब दानवे यांनी जालना येथील जाहीर सभेत नाभिक समाजावरील जातीवाचक वक्तव्य व व्यवसायावरील टीका केली त्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आज दिनांक 15 ,3,2022रोजी क्रांतिवीर विठ्ठल भाई कोतवाल चौक गंगाखेड येथे नामदार रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून गंगाखेड तहसीलदार मार्फत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदना द्वारे रावसाहेब दानवे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे किंवा समाजाची जाहीर माफी मागावी अनेथा नाभिक समाज बांधव आपली दुकाने बंद करून रस्त्यावर उतरून आंदोलन करतील याची सर्वस्व जबाबदारी शासनावर राहील तसेंच नाभिक समाज नेते माननीय बालासाहेब पारवे यांच्या नेतृत्वाखाली हा मुक मोर्चा काढुन पेशकार दत्तराव बिलापटे यांना निवेदन देण्यात आले या वेळी उपस्थित बबन नेजे, राजेभाऊ नेजे , इंद्रजीत गवळी,बालाजी राऊत, शिवाजी शिंदे, शिवाजी डमरे, बालाजी डमरे, विष्णू शिंदे, निलेश जाधव, गजानन गावंडे, पांडुरंग नेजे, प्रकाश वावगडगे, सुनील कानडे,भागवत वावगुडगे, अंकुश डमरे,आदी सह समाज बांधव उपस्थित होते,तसेच अमोल नेजे यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here