



✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)
नाशिक(दि.15मार्च):-नाशिक शहर व जिल्हा पातळीवरील लघुवृतपञ साप्ताहिक व पाक्षिक मुख्य संपादक व संपादक यांची महत्त्वपुर्व बैठक निर्भिड मतदार व निभिड ज्योत कार्यालय मेहेर सिग्नल सिदेकर प्लाझा येथे पञकार संघाचे जेष्ठ पत्रकार निर्भिड चे मूख्य संपादक योगेश घोलप यांच्या अध्यक्षतेखाली तर रिपब्लिकन वार्ता साप्ताहिक मुख्य संपादक अनिल आठवले यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.नाशिक जिल्हा , शहरातील व महाराष्ट्र राज्य मध्ये पञकाराच्या न्याय हक्कासाठी,व पञकार यांच्या वर होत असलेले हल्ले , शासकीय अधिकारी यांच्या कडून उद्धटपणे मिळणारी वागणूक, पोलिस डिपार्टमेंट ची अरेरावी याबद्दल खेद व्यक्त करण्यात आला.
जिल्हा व शहरातील जेष्ठ पत्रकार यांना शासनामार्फत मिळणारी अनुदान महिना पेन्सेन साठी अधिकाधिक प्रयत्न करणं.व विविध विषयांवर चर्चा मार्गदर्शन करण्यात आले.सदर बैठकीत नाशिक जन्म भुमी मुख्य संपादक बाळासाहेब गांगुर्डे, रिपब्लिकन वार्ता संपादक सय्यद, निर्भिड ज्योत प्रकाश गांगुर्डे, वार्ता पञ शोधाऀश मूख्य संपादक डॉ राजेश साळुंके, वार्ता पञ शोधाऺश, मुंबई रिपोर्टर संपादक शांताराम भाऊ दुनबळे ,सह पञकार बांधव उपस्थित होते


