




🔸शिक्षण विभागास १ला क्रमांक मिळवुन द्यावा-निरोप समारंभात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या शुभेच्छा
✒️जिल्हा प्रतिनिधी नाशिक(शांताराम दुनबळे)
नाशिक(दि.15मार्च):-कोविड आणि नैसर्गिक आपत्तीत नाशिक जिल्ह्यात सुरज मांढरे साहेब आपण काम केले कदाचित त्यामुळे आपल्याला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी दिली असेल पण मी म्हणेल तिचे सोने करावे. गत काही वर्षात राज्यात शिक्षण विभागाची खूप अधोगती झाली आहे शिक्षण भरतीसह इतरही बाबींमुळे प्रतिमा डागाळली आहे . त्यामुळे जसे आपण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना उभारी देण्याचे काम केले अगदी तसेच शिक्षण विभागास उभारीची गरज आहे तेव्हा तुम्ही शिक्षण विभागास नंबर एक वर घेऊन जावे.
अशा शुभेच्छा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन मध्ये नूतन जिल्हाधिकारी गंगाधर डी यांचे स्वागत आणि मावळते जिल्हाधिकारी तथा राज्याचे शिक्षण आयुक्त पदी विराजमान झालेले सुरज मांढरे यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता काव्य सादरीकरण मराठीतून व्यक्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भावना तर कुठे शाल जोडे तर कुठे शुभेच्छा रुपी अपेक्षा यामुळे महसूल विभागाचा हा कार्यक्रम पण कुठे ही सरकारी किनार असलेल्याचे जाणवले नाही. अध्यक्षीय मनोगतात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी खास आपल्या शैलीत व्यक्त होताना उपस्थितांचे मनोरंजन केले.
महिनाभरात दोन जिल्हा अधिकाऱ्यांचे पूर्णपणे भिन्न रूपे आपल्या प्रोबेशनरी कालावधीतील एक अनुभव सागतांना गमे यांनी जिल्हा अधिकारी कसाही असो जिल्हा पुढे जातोच. शिक्षण विभागाचे आयुक्त झाले ले सुरज मांढरे यांनी ४१ वर्ष नंतर प्रथमच नाशिक मध्ये आले ते सांगताना येथील वातावरण माणसे माणसे मनाला भावल्याचे आवर्जून उल्लेख केला जिल्ह्यात केलेल्या कामाबाबत सागतांना प्रत्येक व्यक्तीने पद म्हणून नव्हे त्या व्यक्ती म्हणून आपण चिरकार स्मारणात राहु असं काम करण्याचा सल्ला उपस्थितांना दिला जिल्हा माहिती अधिकारी रणजीत राजपुत यांनी खास सुरेश भटांच्या कविता चे सादरीकरण करताना सुरज मांढरे साहेब यांच्यासोबत चे आणि भावाचे कथन केले यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन मुडावरे, तहसीलदार प्रदिप पाटील, नायब तहसीलदार विठ्ठल मोराणकर, कर्मचारी संघटनेचे दिनेश वाघ तलाठी संघाचे निळकंठ उगले सह अनेकांनी शुभेच्छा दिल्या




