Home गडचिरोली आविका संस्थेवर माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार गटाचा वर्चस्व !

आविका संस्थेवर माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार गटाचा वर्चस्व !

78

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.15मार्च):-धानोरा तालुक्यातील पेंढरी आविका वर शेतकरी परिवर्तन पॅनलचा १२ पैकी १० जागा जिंकत जल्लोष साजरा करण्यात आला.पेंढरी येथील आविका संस्था स्थापन होऊन ३०ते ३५ वर्ष होऊन पहिल्यांदा निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणूकीत माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लमवार यांच्या नेतृत्व खाली काँग्रेस समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनलचा १२ पैकी १० उमेदवारांनी प्रचंड बहुमताने विजय संपादन करीत आविका संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित केले.या निवडणूकीत एकूण दोन पॅनल होते. शेतकरी परिवर्तन पॅनल चे ३ बिनविरोध तर, विरोधी पॅनलचे २ उमेदवार निवडून आले. उर्वरीत ७ उमेदवारांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली असता, शेतकरी परिवर्तन पॅनल चे ७ पैकी ७ ही उमेदवार एकतर्फी प्रचंड बहुमताने विजयी झाले.

निवडून आलेले सदस्य खालीलप्रमाणे:रघुनाथ कोठवार, संजय गावडे, राणू गावडे, मंगलसिंग गावडे, रुपेन नाईक, लक्ष्मण राणा, छबिलाल बेसरा,बिनविरोध निवडून आलेले सदस्य:डोमाजी लेनगुरे, जानकीबाई पवार, श्यामबत्ती कुदराम यांनी विजय संपादन करीत गुलाल उधळीत पेढे वाटून विजयाचा जल्लोष साजरा केला.या यशामध्ये जेष्ठ मार्गदर्शक कोमल रावजी पवार, बाबुरावजी गेडाम, दामसिंग उसेंडी, विश्वनाथ मांदाळे, मनोज मंडल, सुरेंद्र चौधरी, अनिल उसेंडी, सोहन गावडे, संजय मडावी, राजुभाऊ नाईक, धनेश पवार, संजय गावडे, केसरी मडावी, नाजूक कड्यामी, विकास कोरचा, पंढरी कावळे, रामदास बावणे, गणेश देवाण, सखाराम कावळे, हेमराज पवार, मदन करंगामी, देवसाय गावडे, शिवचंद नाईक, जयंत राम कोठवार आदी ज्येष्ठ गावकरी व शेतकरी यांचे सहकार्य लाभले. यासाठी माजी जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीनिवास दुल्लमवार यांनी सर्व मतदार बंधू भगिनिंचे व कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here