




✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)
तलवाडा(दि.15मार्च):-महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतेक मनाला हेलवणारी रदयस्पर्शी घटना १९ मार्च १९८६ रोजी चिलगव्हाण ता. महागाव जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी राजा साहेबराव करपे पाटील यांनी सह कुटुंब आत्महत्या केली होती. शासन दरबारी महाराष्ट्रातील हि पहेली बळीराजाची आत्महत्या आसल्याची नोंद नक्किच आसावी परंतु एक शेतकरी सह कुटुंब आत्महत्या करतो हि बाब आज ही आणेक शेतकरी पुत्रांच्या जिव्हारी लागल्याचे निर्देशनास येते.
गेवराई तालुक्यातील आसाच एक शेतकरी पुत्र राजेंद्र बाबुराव नवले रा. बंगाली पिंपळा ता. गेवराई जिल्हा बीड यांनी या घटनेच्या स्मृति स्मरण दिना निमित्त म्हणजेच १९ मार्च २०२२ रोजी पुणे येथे शेतकरी आत्महत्या कलंक पुसन्याच्या विचार धारेला अनुसरून कृषि आयुक्त कार्यालय पुणे येथे आन्न त्याग आंदोलन करण्याचा मनोदय निवेदनाच्या माध्यमातुन व्येक्त केला आसल्याची माहिती प्रस्धिपत्राच्या स्वरूपात माध्यमास शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांनी दिली आहे.




