




✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो;-9975686100
म्हसवड(दि.15मार्च);-महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत पळशी गावच्या सुनबाई माण तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष यांच्या सौभाग्यवती सौ. माधुरी रजनीकांत खाडे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार प्रसंगी प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक आर.डी. खाडे यांनी गौरवोद्गार काढले, निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द आणि मेहनत हीच उपयोगी येते आणि हे सर्व यांनी आपल्याला दाखवून दिलेले आहे त्यांचा सत्कार शिक्षक माण तालुका शिक्षक संघ व शिक्षक बँकच्या वतीने म्हसवड येथे आयोजित करण्यात आलेला होता.
या सोहळ्याच्या निमित्ताने शिक्षक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाषराव शेटे बापू शिक्षक संघाचे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब पवार, संघाचे मार्गदर्शक दीपककुमार पतंगे संघाचे सरचिटणीस सुभाषराव गोंजारी शिक्षण कमिटीचे माजी शिक्षण तज्ञ राजाराम तोरणे शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष सुभाष नरळे परीक्षा मंडळाचे सचिव सुनीलकुमार डोंगरे महिला आघाडीच्या नेत्या रुपाली साखरे ,सुजाता नडे मॅडम, सुरेश सातपुते विजयकुमार शिंदे, बँकेचे मॅनेजर भोजने,नंदकुमार साखरे, जिजाबा नरळे ,रामभाऊ साळुंखे,जावेद मुल्ला, कल्याण भागवत, नामदेव बाबर पाटील, विजयकुमार कापसे, अशोकराव जमाले ,पांडुरंग काळेल, समाधान खांडेकर, महेश साळुंखे व बँकेचे सर्व कर्मचारी यांचे उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.




