



✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मुंबई(दि.15मार्च):-आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेबांनीं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे नेतृत्व सांभाळून देशातील गढूळ वा धर्मांध झालेले राजकारना चे शुद्धीकरण करावे असा मनोदय पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.
आजपर्यंत फक्त सत्ते साठी आंबेडकर चळवळ वेशीला टांगली गेली असून अपवाद सोडून स्वाभिमान गहान ठेवला जात आहे, सत्तेत सहभागी होण्यासाठी आंबेडकरी समूहात आता दिग्गज नेता उरला नसून सर्वांचे कुठे ना कुठे हित जोपासले आहेत, वरिष्ठ नेत्यांनी आता फक्त सल्लागाराच्या भूमिकेत रहावे व युवावर्गाला संधी द्यावी अशी ही प्रतिक्रिया विद्रोही पत्रकार डॉ. माकणीकर यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील समाज् वा देश घडवण्यासाठी युवा नेते राजरत्न आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे नेतृत्व करावे वा देशभर आंबेडकरी सत्तेचे समीकरण बदलावे, आणी ही किमया केवळ राजरत्न आंबेडकरच करू शकतात असा विश्वास ही पॅन्थर डॉ. माकणीकर यांनी बोलून दाखवला.
देशातील बहुतांश युवावर्ग राजरत्न आंबेडकर यांना मानत असून समाजिक व धार्मिक क्षेत्रात अभूतपूर्व योगदान राजरत्न साहेबांचे आहे, निस्वार्थ व पराक्रमी नेतृत्व देशाला लाभल्यास संविधानिक भारत घडण्यास वेळ लागणार नाही, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पार्टी राजरत्न आंबेडकर साहेबांचे मनपूर्वक स्वागत करत असून पक्ष प्रवेशाचे जाहिर निमंत्रण हि राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी दिले आहे.


