Home महाराष्ट्र कारंजा येथे जागो मतदार अभियान प्रारंभ

कारंजा येथे जागो मतदार अभियान प्रारंभ

251

✒️कारंजा(घा)प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.15मार्च)::-तालुक्यात “जागो मतदार अभियानाला प्रारंभ झाला .संभाजी ब्रिगेड चे नेते पियुष रेवतकर यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड कारंजा तालुका कमिटी तर्फे जागो मतदार हा उपक्रम कारंजा तालुक्यात संपूर्ण ठिकाणी राबविण्यात येत आहे .या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना मतदानाचे महत्व समजावून लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा वापर करा या बद्दल संभाजी ब्रिगेड तर्फे मार्गदर्शन करण्यात येत आहे .

अभियानाच्या सुरवातीलाच नागरिकांचा उदंड प्रतिसाद या अभियानाला मिळाला आहे .मतदान हे जगातलं सर्वश्रेष्ठ दान आहे ,बाबासाहेबांनी दिलेल्या या अमूल्य अधिकाराचा लोकशाही देशातील लोकशाही मजबुत करण्यासाठी देशातील नागरिकांनी याचा वापर करावा असे मत पियुष रेवतकर यांनी व्यक्त केले .या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्ष पाठे ,चेतन चौधरी ,दक्ष उईके ,संभाजी ब्रिगेड चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते कारंजा तालुक्यातील अनेक गावात या अभियानासाठी परिश्रम घेत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here