Home महाराष्ट्र शंभूराजे आणि सावित्रीमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैचारिक प्रबोधन

शंभूराजे आणि सावित्रीमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैचारिक प्रबोधन

49

🔸फुले दाम्पत्यांनी बहुजनांचा हितासाठी आपला देह, संतती व संपत्ती खर्ची घातले – शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

एरंडोल(दि.15मार्च):– येथील माळीवाडा परिसरातीळ बालवीर चौकात स्वराज्य रक्षक संभाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैचारिक प्रबोधन व्याख्यान संपन्न झाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ यांनी केले. प्रास्तविकपर मनोगतातून प्रबोधन जागराचे महत्व व वक्त्यांचा परिचय शिरसाठ सरांनी आपल्या ओघवत्या शब्दांत करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल नगरीचे माजी नगराध्यक्ष देविदास महाजन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत शिरोमणी सावता महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुन करण्यात आली. आलेल्या मान्यवरांचा वैचारिक ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राकेश पाटील सर जिल्हा सचिव डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद एरंडोल यांनी संभाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला. बहुजनांचे कैवारी छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी तसेच रयतेसाठी केलेला संर्घष, ३२ वर्ष वयाच्या संघर्षमय इतिहासावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काही समाज कंटक जाणीवपूर्वक विद्रुपीकरण व विकृतीकरण करत आहेत. कट्टरवादी लोक राजेंचा इतिहास चुकीचा सांगून, महाराजांचे दैवतीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन राकेश पाटील यांनी केले.शिवव्याख्याते तथा विकल्प ऑर्गनायझेशन धरणगावचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीमाई आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. फुले दाम्पत्यांनी बहुजनांचा हितासाठी आपला देह, संतती व संपत्ती खर्ची घातले.

सावित्रीमाईंनी स्रियांचा उद्धारासाठी कर्मठ धर्माच्या ठेकेदारांनी केलेला अज्ञायाविरुध्द बंड पुकारले स्रियांना व अस्पृशांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. त्यांनी केलेल्या जिवन संर्घषावर प्रकाश टाकणारे प्रबोधन लक्ष्मण पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी तहसिलदार अरुण माळी यांनी कार्यक्रमाच्या आयोजकांची स्तुती केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांनी दोन्ही वक्त्यांनी मांडलेल्या विचारांचे कौतुक केले. पुरोगामी इतिहास व महापुरुषांचे कार्य आजच्या नवीन पिढीने व तसेच माता भगिनींना जाणून घेतले पाहिजे, असे प्रतिपादन देविदास महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन तसेच प्रमुख अतिथी म्हणून माजी तहसिलदार अरुण माळी, प्रा. भरत शिरसाठ , गोपाल पाटील, गणेश महाजन, प्रकाश चौधरी, दगडु पाटील, अतुल महाजन, कमलेश महाजन, समाधान महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला परिसरातील महिला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधक शिवदास महाजन, प्रल्हाद महाजन, अनिल महाजन, हिम्मत महाजन, गणेश महाजन, मनोज महाजन, दिनेश महाजन, प्रविण पाटील, हेमंत महाजन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविराज पाटील यांनी केले तर आभार सत्यशोधक शिवदास महाजन यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन सत्यशो़धक समाज चळवळ समिती, एरंडोल यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here