




✒️नायगाव तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650
नायगाव(दि.14मार्च):-समतेचे नायक, महान क्रांतिकारक, क्रांतीसुर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा औरंगाबाद शहरातील एमआयडीसीच्या शिवा सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पुतळ्याची तोडफोड करून विटंबना केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे या मागणीसाठी शिवा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.औरंगाबाद येथील बजाज नगर मधील शिवा सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करण्यात आली.
एमआयडिसीची जागा हडप करणाऱ्या कैलाश भोकरे व त्यांच्या साथीदारांवर मोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सदर आरोपीस हद्दपार करावे व संबंधित अधिकारी यांची कसून चौकशी करून निलंबित करावे या मागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनचे नायगाव तालुका अध्यक्ष राजेश आणेराये यासह सचिन धोते, शिवकुमार बेंद्रिकर, बालाजी धोते, भीमाशंकर विभुते, विश्वनाथ बोंमनाळे, शिवराज पांडागळे, संतोष बेंद्रिकर, प्रताप बेंद्रिकर या पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार नायगाव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.




