




🔹रुग्णांच्या सोई सुविधा टाकल्या उकिरड्यावर
🔸ग्रामीण रुग्णालयात होतेय रुग्णाची गैरसोय
✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193
नांदगांव खंडेश्वर(दि.14मार्च):-येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गैरसोय होत आहे. नांदगांव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे मोठ्या संख्येने रुग्ण आपली आरोग्य तपासणी करण्यासाठी येत असतात तसेच रुग्ण भर्ती सुद्धा होत असतात. मात्र याच काळात रुग्णालयात उपचार घेत असतांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तिथे कार्यरत असलेल्या परिचारिका ह्या धमकावून जबरीने बाकड्यावर इंजेक्शन लाऊन घेण्यास भाग पाडत आहे. ज्यामुळे लाजवेल असे कृत्य तिथे घडत आहे. महिलांना सुद्धा बाहेरच इंजेक्शन घ्यावे लागत आहे.
शासनाने दवाखान्यात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असून सुद्धा असा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्या सुविधा कुठे उकिरड्यावर नेऊन टाकल्या की काय असा प्रश्न पडतोय. एखादा आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण तपासनीस आला व इंजेक्शन घेता वेळ बाकड्यावरून तोल जाऊन खाली पडल्यास कोण जबाबदारी घेणार असा प्रश्न रुग्ण विचारीत आहे. रुग्णालयात जर पूर्ण सुविधा उपलब्ध असेल तर मुद्दाम रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तरी संबधित आरोग्य अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी रुग्ण करीत आहेत.




