Home महाराष्ट्र ईळेगाव विविध कार्यकारी सोसायटी संचालक पदासाठी जयदेव मिसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ईळेगाव विविध कार्यकारी सोसायटी संचालक पदासाठी जयदेव मिसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

41

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधि)

गंगाखेड(दि.14मार्च):;तालुक्यातील सहकार क्षेत्रात महत्वाची असलेल्या ईळेगाव विवीध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक पदासाठी जयदेव मिसे यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केला.

ईळेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी संचालक पदाची निवडणूक होत आहे. संचालक पदासाठी ग्रुप सोसायटी असलेल्या मसनेरवाडी येथील माजी सरपंच जयदेव मिसे यांनी संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर, मुंजाभाऊ लांडे आदींची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी समाधान पवार पाटील यांनी हा अर्ज दाखल करून घेतला. जयदेव मिसे यांच्या उमेदवारीने सोसायटी निवडणूकितील गणिते बदलणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here