Home महाराष्ट्र कॉलनीवासीयांकडून मुख्याधिकारी व तहसिलदार साहेबांना निवेदन….

कॉलनीवासीयांकडून मुख्याधिकारी व तहसिलदार साहेबांना निवेदन….

252

🔸जी.आय.एस नगर, जी.एस.नगर, कृष्ण गीता नगर, शांती विजय नगर, साई दरबार नगर या कॉलनींची नावे प्रभाग ११ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी.

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगाव(दि.14मार्च):- आज रोजी जी.आय.एस नगर, जी.एस.नगर, कृष्ण गीता नगर, शांती विजय नगर, साई दरबार नगर या कॉलनींची नावे प्रभाग ११ मध्ये समाविष्ट करण्याची मागणी सर्व कॉलनीवासियांतर्फे करण्यात आली.वरील पाचही कॉलनी राहिल्या धरणगाव नगरपरिषद हद्दीत येत असून या सर्व नगरांची प्रभाग क्रमांक ११ नेहरूनगर – मातोश्रीनगर प्रारुप यादी मध्ये नावे समाविष्ट करण्यात यावी.

अशी विनंती नगर परिषदेचे मुख्याधिकारी जनार्दन पवार साहेब व निवडणूक शाखा विभागाचे प्रमुख तहसीलदार नितीनकुमार देवरे साहेब यांना निवेदनातून देण्यात आली. मुख्याधिकारी जनार्दन पवार साहेब यांनी नक्कीच येत्या काही दिवसात आपल्या सर्व कॉलनींचा प्रभाग ११ मध्ये समावेश करण्यात येईल असे आश्वासन कॉलनीवासियांना दिले.या प्रसंगी सर्व कॉलनीवासीयांमधून प्रातिनिधिक स्वरूपात जे. एस.पवार, सुधाकर मोरे, एस.एन.कोळी, पत्रकार पी.डी.पाटील, विनायक कायंदे, महादू अहिरे, महेंद्र सैनी, नितीन मराठे, राकेश माळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here