




🔹महिला व पुरुषांचा समावेश
🔸पोलीस अधीक्षक सचिन पाटील पुन्हा आक्रमक
✒️नाशिक प्रतिनिधी(विजय केदारे)
नाशिक(दि.14मार्च):-पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे जिल्ह्यातील अवैद्य धंदे बाबत पुन्हाआक्रमक झाले आहे त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी येथे एका रिसॉर्टवर मध्यरात्री छापा टाकण्यात आला या ठिकाणी हुक्का पार्टी सुरू असल्याचे आढळून आले तसेच तेथे उपस्थित असलेल्या महिला व पुरुष अशा एकूण 70 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना गुप्त माहिती मिळाली त्रिगलवाडी येथे हुक्का पार्टी असून त्यात महिला व पुरुषांची संख्या मोठी असल्याने सांगण्यात आले.
त्यानंतर सचिन पाटील यांनी विशेष पथक तयार केले या पथकाने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास छापा टाकला याऊ का पार्टीमध्ये साठ ते सत्तर जण सहभागी होते त्यात 25 ते 30 महिला आणि अन्य पुरुषांचा सहभाग होता या सर्व जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते यापूर्वीही इगतपुरीतील पार्टी पार्टी होत असल्याचे दर्शन झाले ताब्यात घेण्यात आलेल्या म्हणजे प्रमाण मोठे असल्याचे सांगितले जात आहे इगतपुरी तालुक्यातील रिसॉर्ट मध्ये हाय प्रोफाईल पार्ट्या सातत्याने होत आहेत यावेळी ग्रामीण पोलिसाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते मात्र तरीही या पाठाचे आयोजन थांबत नाही




