Home महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी महिला आघाडी ब्रम्हपुरी तर्फे महिला दिनानिमित्य महिला सायकल स्पर्धेचे...

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी ब्रम्हपुरी तर्फे महिला दिनानिमित्य महिला सायकल स्पर्धेचे यशस्वी आयोजन

99

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.13मार्च) :-भा. ज. पा. जिल्हा महिला आघाडी व भारतीय जनता पार्टी महिला आघाडी ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने व भारतीय जनता युवा मोर्चा च्या सहकार्याने 13 मार्च रोजी सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रम्हपुरी येथे महिला दिनाचे औचित्य साधत खास महिलांसाठी सायकल स्पर्धाचे यशस्वी आयोजन मा.सुधीर मुनगंटीवार व कु.अल्का आत्राम यांच्या सहकार्याने करण्यात आले.

स्पर्धा दोन गटांमध्ये आयोजित होती, गट क्रमांक एक वर्ष 15 ते वर्ष 30 वर्षातील महिलांमध्ये प्रथम क्रमांक तन्वी प्रधान, द्वितीय क्रमांक आरती मुकुंद भानारकर तर तृतीय क्रमांक तृष्णा कोरे यांनी पटकावला.तर गट क्रमांक दोन मध्ये 31 वर्ष व पलीकडे असलेल्या गटामध्ये प्रथम क्रमांक सौ.कविता तुषार मोहता, द्वितीय क्रमांक श्रीमती सुषमा थोटे, तृतीय क्रमांक श्रीमती रेखा गणवीर यांनी पटकाविला. दोन्ही गटासाठी प्रथम पारितोषिक 5000 रूपये , व्दितीय- 3000 रूपये , तर तृतीय क्रमांक करीता 2000 रूपये होते. दुसऱ्या गटातील प्रथम पुरस्कार विजेते सौ कविता तुषार मोहता यांनी द्वितीय व तृतीय क्रमांकावरील स्पर्धक मागे राहिल्या गेल्याने आपल्या पारितोषिकाची रक्कम दोन्ही स्पर्धकांना वाटून देत महिला दिना निमित्त माणुसकीचे दर्शन घडवित मनाचा मोठेपणा दाखवला. 15 ते 30 वयोगटात एकूण 115 स्पर्धकानी तर 30 ते पुढील वयोगटात 73 स्पर्धकानी सहभाग घेतला होता.

स्पर्धेच्या यशस्वितेसाठी माजी आमदार प्रा.अतुल देशकर,रेशमीताई पेशने, कृष्णा सहारे,संजय गजपुरे, प्रा संजय लांबे,दीपालीताई मेश्राम,वंदनाताई शेंडे,हेमलता ताई नंदूरकर,धोटे ताई,अनघाताई दंडवते,सौ.मंजिरीताई राजनकर,सौ.पुष्पा गराडे,सौ.बालपांडे,सौ.नलीनी बगमारे,डॉ.बालपांडे,प्रा.शेंडे,नांमदेवजी लांजेवार, प्रा. सालवाटकर,पंढरीजी खानोरकर मनोजभाऊ भूपाल,मनोजभाऊ वटे, अरविंद नंदूरकर, साकेत भणारकर, प्रा.सुयोग बाळबुधे, स्वप्नील अलगदेवे,प्रमोद बांगरे,पावन जयस्वाल, अमित रोकडे,केतन पेशने,प्रशांत चव्हाण,क्रीष्णा वैद्य, रोशन सावरबांधे व पंच म्हणून ब्रम्हपुरी शारीरिक विभागातील सर्व प्रमुख उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here