Home महाराष्ट्र विठ्ठलवाडा ते दरूर मार्गावरील रस्त्याच्या कामात ठेकेदाराची मनमानी

विठ्ठलवाडा ते दरूर मार्गावरील रस्त्याच्या कामात ठेकेदाराची मनमानी

349

🔹भंगाराम तळोधी गावातील रस्त्याचे काम महिन्यापासून बंद, गावकरी त्रस्त

✒️भंगाराम तळोधी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

भंगाराम तळोधी(दि.14मार्च):- गावातील रस्ता सध्या जीवहानीचे केंद्र बनले आहे. तुम्हाला जगायचे असेल तर कच्चा रस्ता ची सवय करा, कुणीही कितीही जीव गेले तरी चालेल पण काम आमच्या मनासारखेच करणार, अशीच कार्यपद्धती सध्या चालू असलेल्या रोडच्या कामावरून दिसून येत आहे. सर्वीकडे पर्यावरणाचे दिन साजरे होतात तर भंगाराम तळोधी मध्ये प्रदूषणाचे दिन साजरे होतात, या आधुनिक काळात मनुष्य युगाची जलद गतीने प्रगती होत आहे. प्रत्येक गावात रस्ते बंद आहेत अशाच विचारातून जेव्हा भंगाराम तळोधी आंध्र प्रदेश जोडणारा महामार्ग मंजूर झाला तेव्हा समस्त गावकरी खूप आनंदी झाले. आपल्या गावातून महामार्ग होणार गाड्यांची व व्यवसायाची आवक वाढेल, जगासोबत आमच्याही गावाची प्रगती होईल, अशा विचाराने गावकरी आनंदाच्या समुद्रात डुबले, परंतु गावकऱ्यांना काय माहित की जीव देऊन रस्ता तयार होईल.

रोडचे काम सुरू झाले तर खरे परंतु सुरुवातीपासूनच या कामात भ्रष्टाचाराची चाहूल दिसून येत होती. आज हा भ्रष्टाचार गावकऱ्यांच्या शिघेला गेला आहे. महिनाभरापूर्वी गावातील कामाला सुरुवात केली. गावकऱ्यांना सांगण्यात आले की एक ते दोन महिन्याच्या आत रस्त्याचे पूर्ण काम केले जातील. सुरुवातीला बाजूच्या नाली बांधण्यात आल्या. त्या नळीला जास्तीत जास्त पाच ते सहा दिवस पाणी मारले असावे. त्यानंतर रोडचे काम सुरू केले. सर्व गावातील रोड फोडफाड करून पूर्ण खड्ड्यांचा रस्ता बनवून ठेवले. त्यानंतर बाजार चौकातील एक बाजू चे रोड उंच केले व दुसरी बाजू आणि इतर संपूर्ण गावातील कामे बंद करून दुसरीकडे निघून गेले. भंगाराम तळोधी येथील बाजार चौक म्हणजे गावची शान व्यापाराचा कणा; मात्र या सर्व गोष्टीवर ठेकेदारांचे दुर्लक्ष, या बाजार चौकातील रोडवरून रोज कुणी ना कुणी गाडी घेऊन पडत आहेत. काही दिवसांपूर्वीच यांच्या मनमानीमुळे एक हुशार,लोकांचा मदतीला धावणारा व्यक्ती मरण पावला.

या भागात व्यापारीवर्ग भरपूर आहे. येथील व्यापाऱ्यांना आपला धंदा बंद करावा की काय? हेच समजत नाही आहे. एकीकडे व्यापाराची मंदि आणि दुसरीकडे अशा विनाकरणाच्या समस्या? या चौकात दिवसभर धुळीचे वातावरण असते. ठेकेदाराने रोज दोन वेळा तरी रस्त्याला पाणी मारावे मात्र येथे सर्व ठेकेदाराची मनमानी चालू आहे. त्यांना वाटेल तर पाणी मारतील, काम चालू करतील, अन्यथा तुम्ही हे भोगा. या अशा ठेकेदारांच्या कामामुळे गावातील सर्व व्यापारी, नागरिक व ऑटोचालक त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराने रोज रस्त्याला पाणी मारावे व सर्वात प्रथम गावातील रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी व्यापारी संघटना गावातील नागरिक आणि ऑटो संघटनेकडून मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here