Home महाराष्ट्र माजलगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तात्काळ ऊसतोडणी करून कारखान्यास न्यावा – राजेश्वर...

माजलगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तात्काळ ऊसतोडणी करून कारखान्यास न्यावा – राजेश्वर मोरे

366

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

माजलगाव(दि.14मार्च):- तालुक्यातील बऱ्याच प्रमाणात अनेक शेतकऱ्यांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडणी करून कारखान्यास नेण्यासाठी वारंवार कारखान्याचे अधिकारी कर्मचारी यांना ऊसतोडणी बाबत विचारणा करून ऊसतोडणी होत नसल्याने माजलगाव तालुक्यातील शेतकरी त्रस्त होत आहेत. कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की, सध्या टोळी ऊसतोडणी करण्यासाठी टोळी नाही. अशा प्रकारचे काही कारणे सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवणूक करण्यात येत असल्यामुळे रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. अँड. रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रयत शेतकरी संघटनेचे माजलगाव तालुकाध्यक्ष राजेश्वर मोरे हे या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

आणि ऊसतोडणी लवकर होत नाही. व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस लागवडीचा कालावधी जास्त झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. तालुक्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तक्रार तालुकाध्यक्ष राजेश्वर मोरे यांच्या कडे वारंवार येत असल्यामुळे राजेश्वर मोरे यांनी निवेदनाद्वारे विनंती करून सांगितले आहे की. तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस १५ मार्च पासून तोडणी करून ऊस कारखान्यास न्यावा अन्यथा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसह धरणे आंदोलन व बैलगाडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील राजेश्वर मोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे

Previous articleचौगान सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी विकास पॅनलचा झेंडा
Next articleविठ्ठलवाडा ते दरूर मार्गावरील रस्त्याच्या कामात ठेकेदाराची मनमानी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here