Home महाराष्ट्र चौगान सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी विकास पॅनलचा झेंडा

चौगान सेवा सहकारी संस्थेवर शेतकरी विकास पॅनलचा झेंडा

272

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 13 मार्च):-ब्रम्हपुरी तालुक्यातील चौगान येथील सेवा सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत 13 पैकी 13 ही जागेवर काँग्रेस, रिपाई व वंचित पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल च्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केला. तर पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या पतीचा दारूण पराभव झाला.काँग्रेस, रिपाई व वंचित पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल (तिडके गट) व युवा परिवर्तन पॅनल ह्या मधे हा निवडणुकीचा सामना रंगला होता. पण आधी पासूनच शेतकरी विकास पॅनल दबदबा कायम असल्याने त्यांनी एकहाती सत्ता खेचून आणली.

विजयी उमेदवार मधे सुनीता खेमराज तिडके, सुलभा प्रकाश बुराडे, दिवाकर बक्षी मातेरे, दिगंबर रामदास लिंगायत, अविनाश मंसाराम सहारे, सुरेश वारलु गुणशेटवार, धनराज परसराम तुंबड़े, श्रीहरी नारायण देवगडे, शिवाजी रामचंद्र नखाते, उत्तम अर्जुन नाकतोडे, जनार्दन सदाशिव नाकतोडे, शालिकराम शंकर मैंद, रमेश शामराव राऊत यांचा समावेश आहे. तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली व पंकज तिडके यांच्या नेतत्वाखाली शेतकरी विकास पॅनल ने निवडणूक लढवून आपली सत्ता कायम ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here