Home महाराष्ट्र पियुष रेवतकर यांना पुरस्कार जाहीर

पियुष रेवतकर यांना पुरस्कार जाहीर

193

✒️कारंजा(घा)प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.13मार्च):-जनहित फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारे दरवर्षी दिल्या जाणारा महाराष्ट्र रत्न पुरस्कार ह्या वर्षी पियुष रेवतकर यांना जाहीर .गेल्या पाच वर्षांपासून जनहित फाउंडेशन तर्फे दरवर्षी हा पुरस्कार महाराष्ट्रातील नेतृत्व ,कर्तृत्व ,वक्तृत्व मध्ये परिपूर्ण असलेल्या लोकांना दिल्या जातो .महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2022 साठी वर्धा जिल्ह्यातील पियुष रेवतकर यांची निवड करण्यात आली .पियुष रेवतकर गेल्या काही वर्षांपासून सामाजिक ,राजकीय कार्यात सक्रीक असून कोरोना काळात अनेक लोकांना त्यांनी अन्य धान्याच्या किट वाटून किंवा रुग्णाच्या दवाखान्याच्या येणाऱ्या खर्चाला स्वतः वर भार घेऊन मदत केली.

कवी ,लेखक ,पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर यांनी आपल्या लेखणी द्वारे ,कार्या द्वारे व वक्तृत्व द्वारे अनेकांच्या प्रश्नाला वाचा फोडला आहे .14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त हा पुरस्कार त्यांना नागपूर येथे देण्यात येणार आहे .किमंत ही पैस्याला नसून ,नेतृत्व ,कर्तृत्व ,आणि वक्तृत्व ला मार्ग समजून उंचावर आलेल्या लोकांना आहेत आणि आज या महाराष्ट्र ला अश्या लोकांची गरज आहे असे मत पियुष रेवतकर यांनी व्यक्त केले .पियुष रेवतकर यांना पुरस्कार मिळण्याचं पूर्ण श्रेय त्यांनी त्यांचे गुरू राजेंद्र भुजाडे यांना दिलेलं आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here