



✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.13मार्च):– येथील समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळाच्या वतीने श्री. संत तुकाराम महाराज बिजनिमित अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची उत्साहात सुरवात झाली. गेल्या ३३ वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांच्या वतीने संत तुकाराम महाराज बिजनिमित अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाची गेल्या ३३ वर्षांपासून ची अखंड परंपरा असून हे ३४ वे वर्ष आहे. तत्पूर्वी राजेंद्र शंकर पाटील यांनी सपत्नीक कलश पूजन करून करून सप्ताहाला सुरवात झाली. भिमराज अर्जुन पाटील यांनी सपत्नीक पूजन करून गाथा पारायणाची सुरवात झाली. दि. १३/०३/२०२२ ते २०/०३/२०२२ दरम्यान हा किर्तन सप्ताह संपन्न होणार आहे. ह.भ.प. संजय महाराज पवार(देवपिंप्री), लक्ष्मण महाराज (तांदळवाडी), महेश महाराज (चिखलीकर), मुरलीधर महाराज (कढरीकर), अमृत महाराज (बेटावद), चत्रभुज महाराज (सी.एस.पाटील सर), खुशाल महाराज (म्हाळसा पिंपळगाव) आणि मनोज महाराज कुलकर्णी (जळगांव) यांचे काल्याचे किर्तन संपन्न होणार आहे.
त्याचप्रमाणे सलग ७ दिवस जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथेचे पारायण ह.भ.प. संजय महाराज (जळगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. सर्व समाज बांधवांना जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथेचे वाटप समाजामार्फत करण्यात येणार आहे. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी गुणवंत विद्यार्थी – विद्यार्थीनींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील सालाबादप्रमाणे संपन्न होणार आहे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह राजेंद्र शंकर पाटील यांच्या कडून संपन्न होणार असून गाथा पारायण भिमराज अर्जुन पाटील यांच्या कडून संपन्न होणार आहे. कीर्तनासाग व गाथा पारायणाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने केले आहे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाच्या कार्यक्रमाचे संयोजन ह.भ.प. सी.एस.पाटील सर धरणगावकर यांनी केले असून आयोजन समस्त कुणबी पाटील समाज पंच मंडळ लहान माळी वाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.


