Home महाराष्ट्र शेतातील हरभरा पिकाच्या धिगाला अज्ञात इसमाने लावली आग

शेतातील हरभरा पिकाच्या धिगाला अज्ञात इसमाने लावली आग

141

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.13मार्च):-सोनेगाव येथील शेतकरी मोर्यकांत बळवंत गोहने (42) यांच्या शेतातील हरभरा पिकाच्या धिगाला अज्ञात इसामने शनिवार 12 मार्च रोजी रात्री 11:30 वाजता दरम्यान आग लावली यात शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान झाले. शेतकरी मोर्यकांत गोहने हा शेतातून घरी आला असता रात्री अज्ञात इसमाने त्यांच्या शेतातील हरभरा पिकाच्या धिगाला आग लावली.

ही माहिती मिळताच ठाणेदार बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनात उप पोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे, रंजित भुरसे, मनोज धकाते, सिद्धार्थ रंगारी, रवी वाभीटकर, सचिन वासाडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अज्ञात इसमा विरुद्ध कलम 435 गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक गौरीशंकर आमटे करित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here