Home महाराष्ट्र श्यामराव अभिमान नाईक यांचे दुःखद निधन

श्यामराव अभिमान नाईक यांचे दुःखद निधन

82

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.13मार्च):-श्यामराव अभिमान नाईक यांचे वयाच्या 82 व्या वर्षी आज सकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, राजेंद्र नाईक, व शिक्षक, मनोज नाईक, यांचे ते वडील होते.गेल्या महिन्याभरापासून त्यांचा वृद्धापकाळातील विविध आजारामुळे पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटल मध्ये उपचार चालू होते परंतु आज(13 मार्च) सकाळी त्यांचे 5:00 वाजता निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 82 वर्ष होते.

त्यांच्या पश्चात मुलगा, राजेंद्र नाईक, शिक्षक, मनोज नाईक, मुलगी, मनोरमा संजय मनवर, सुनबाई, नातवंड व जावई संजय मनवर असा आप्त परिवार आहे.त्यांचा अंत्यसंस्कार, आज दिनांक,13 मार्च,2022 रोजी दुपारी,3:00 वाजता नवीन पुसद येथील मोक्षधाम येथे करण्यात आला.यावेळी त्यांचे नातेवाईक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील पुढारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here