Home महाराष्ट्र गंगाखेड तालुक्याच्या इतिहासातील पहिला अभूतपूर्व ऐतिहासिक शेतकरी बांधवांचा लढा

गंगाखेड तालुक्याच्या इतिहासातील पहिला अभूतपूर्व ऐतिहासिक शेतकरी बांधवांचा लढा

106

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.13मार्च):-वीस दिवस गंगाखेड तालु्यातील वीस वेगवेगळ्या गावचे शेतकरी बांधव रोज मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्कासाठी अखंड लढा देत आहेत.खरच डोंगरी जन परिषदेचा हा लढा अविस्मरणीय आहे.गेल्या वीस दिवसापासून डोंगरी जन परिषदेच्या वतीने गंगाखेड तहसिल कार्यालयासमोर गंगाखेड तालुक्यातील शेतकरी बांधवांचे विवीध मागण्या ज्यामध्ये 2018 सालीच्या कोरड्या दुष्काळाचे हेक्टरी 6800 रुपये अनुदान देण्यात यावे.2020 चा पिकविमा आद्याप देण्यात आलेला नाही तो देण्यात यावा.व तसेच 2021 सालचा पिकविमासुध्दा आणखी मंजूर करण्यात यावा यासारख्या अनेक मागण्याकरिता डोंगर भागातील शेतकऱ्यांचे डोंगरी जन परिषदेच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले.
पहिला दिवस डोंगरगावचे शेतकरी बांधव तसेच इतरही पंचक्रोशी मधील बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून वाजत गाजत संपूर्ण शहरातुन रॅली काढत उपोषण सुरू केले.

त्यानंतर “एक गाव एक दिवस” साखळी उपोषणाचा दिवस याप्रमाणे
*दुसरा दिवस २३/०२/२०२२ “डोंगर जवळा”गाव*
*तिसरा दिवस २४/०२/२०२२ ” मानकदेवी गाव”*
*चौथा दिवस २५/०२/२०२२ “शेंडगा गाव*
*पाचवा दिवस २६/०२/२०२२ रोजी “पिंपळदरी गाव”*
*सहावा दिवस २७/०२/२०२२ रोजी ” पडेगाव”*
*सातवा दिवस २८/०२/२०२२ रोजी आरबुजवाडी गाव*
*आठवा दिवस ०१/०३/२०२२ रोजी धनगरमोहा गाव*
*नवावा दिवस ०२/०३/२०२२ रोजी पोखरर्णी गाव*
*दहावा दिवस ०३/०३/२०२२ रोजी आंतरवेली गाव*
*अकरावा दिवस ०४/०३/२०२२ रोजी बोर्डा गाव*
*बारावा दीवस ०५/०३/२०२२ रोजी खोकलेवाडी गाव*
*तेरावा दिवस ०६/०३/२०२२ रोजी सांगळेवाडी गाव*
*चौदावा दिवस ०७/०३/२०२२ रोजी शेलमोहा गाव*
*पंधरावा दिवस ०८/०३/२०२२ रोजी खदगाव*
*दिनांक ०९/०३/२०२२ रोजी कोद्री गाव*
*दिनांक १०/०३/२०२२ रोजी आकोली गावचे शेतकरी बांधव*
*दिनांक ११/०३/२०२२ रोजी बडवनी गाव*
*दिनांक १२/०३/२०२२ रोजी म्हणजेच आंदोलनाचा एकोणिसाव्या दिवशी उंडेगाव या गावचे ग्रामस्थ*
व *आज १३/०३/२०२२ रोजी म्हणजेच विसाव्या दिवशी माखणी या गावचे शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.*

म्हणजेच आंदोलनाच्या विसाव्या दिवशी गंगाखेड तालुक्यातील पंचक्रोशी एकटवली आहे. तरी सुध्दा प्रशासन दखल घेताना दिसत नाही.आता सर्व शेतकरी बांधवांनी डोंगरी जन परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कठोर पावले उचलावी लागतील कारण हे कुम्भकरणा सारखे सोंग घेऊन झोपलेला सरकार जाग करावा लागणार आहे .या आंदोलनाला जरी गंगाखेड तालुक्यांतील सर्व पक्षांनी सर्व व्यापारी बांधवानी पाठिंबा दिला असला तरी जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री साहेबापर्यंत , प्रशासना पर्यंत हे आंदोलन पोचत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्वाणीचा इशारा डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयजक श्री पंडितराव घरजाळे यांनी दिला आहे.हा लढा कोणा एका व्यक्तीचा नाही तो तुम्हा आमचा आहे.आपलं गंगाखेड तालुक्याचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here