Home महाराष्ट्र पतंजली महिला योग समिती घुग्घुसतर्फे जागतिक महिला दिन साजरा

पतंजली महिला योग समिती घुग्घुसतर्फे जागतिक महिला दिन साजरा

61

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔸योग हा महिलांना सुदृढ आयुष्य जगण्याचा महामार्ग – किरणताई बोढे

घुग्घुस(दि.13मार्च):-येथील प्रयास सभागृहात पतंजली महिला योग समिती घुग्घुसतर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. भारत माता, राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. किरणताई बोढे अध्यक्ष प्रयास सखी मंच, प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अर्चनाताई भोंगळे मार्गदर्शिका प्रयास सखी मंच, सौ. नितुताई चौधरी माजी जिप सभापती, माजी ग्रामपंचायत सदस्य सौ. सुचिताताई लुटे, वैशालीताई ढवस, सौ. लीलाताई बोढे मंचावर उपस्थित होते.

मनोगत व्यक्त करतांना सौ. किरणताई बोढे म्हणाल्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करू नये महिलांनी दररोज योगा केला पाहिजे त्यामुळे ऊर्जा मिळते व आरोग्य चांगले राहते समाजात स्त्रियांशी प्रत्येकाने आदराने वागले पाहीजे तसेच मुलींनी कराटे शिकले पाहिजे त्यामुळे ती स्वतःचे रक्षण करणार मुलींना अबला नाही तर सबला बनवा.याप्रसंगी योग सराव व नृत्य सादर करण्यात आले.संचालन अनघा नीत यांनी केले तर आभार मंगला उगे यांनी मानले.यावेळी सुलभा ठाकरे, सुमन वऱ्हाटे, माया ठेंगणे, मंदा थेरे, सुमन बेलोरकर, कविता झाडे, इंदू पुरटकर, गीता क्षीरसागर, आशा बोबडे, मीरा काकडे, चंद्रकला खांडेकर, पुष्पलता कुंभारे, इंदिरा खांडेकर, जया ठाकरे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.

Previous articleराजस्थान आणि छत्तीसगड सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करायला लावणार – नानाभाऊ पटोले
Next articleगंगाखेड तालुक्याच्या इतिहासातील पहिला अभूतपूर्व ऐतिहासिक शेतकरी बांधवांचा लढा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here