



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114
गेवराई(दि.13मार्च):-महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आज गेवराई येथे 14वे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन प्रसंगी उपस्थित होते. अशोक पाटील माजी मंत्री, राजेसाहेब देशमुख, संजय राठोड ,देवानंद पवार यांची उपस्थिती होती.कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष श्री विष्णू आडे, तालुकाधयक्ष श्री जितेंद्र दहिफळे,अशोक भोजगुडे, वारे,नवनाथ बोडखे, शिक्षक पतसंस्था संचालक विष्णू खेत्रे, पुरुषोत्तम पराड यांनी निवेदन दिले.राजस्थान आणि छत्तीसगड सरकारने 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे .
पेन्शन ही कर्मचाऱ्यांना देणे खूप महत्त्वाचा विषय आहे.मागील 5 वर्षापासून शिक्षक व कर्मचारी संघटना यासाठी आंदोलन ,मोर्चे काढीत आहेत. पेन्शन ही अगदी रास्त मागणी आहे आणि त्यांचा तो हक्क आहे.म्हणून याच धर्तीवर देशामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस शासित सरकार असेल त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होईल. आणि महाराष्ट्रातही लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांनी केली आहे.


