Home महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आर्थिक उद्धार करणारा अर्थसंकल्प — आमदार देवेंद्र भुयार

शेतकऱ्यांचा आर्थिक उद्धार करणारा अर्थसंकल्प — आमदार देवेंद्र भुयार

97

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाचा अर्थसंकल्प असून राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प मांडला आहे.

आजचा हा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेने टाकलेलं पुढचं पाऊल आहे, या अर्थसंकल्पामध्ये २० लाख नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना ५० हजार रुपयांची मदत, ९६४ कोटी रुपयांची भूविकास बँकेची कर्जमाफी, खरीप हंगामात ० टक्के व्याजदराने कर्ज, ४३ लाख शेतकऱ्यांना ९११ कोटी रुपयांचा निधी, विदर्भ मराठवाड्यात ३१०० कोटी रुपयांचा विशेष निधी, ६० हजार कृषी पंप जोडणीचे उद्दिष्ट, सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर, आरोग्य, शिक्षण, आरोग्य, जलसंधारण यासह सर्वच घटकाला न्याय देऊन शेतकरी जनतेसाठी, आपल्या राज्यातील सर्व माता, भगिणींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा, शेतकऱ्यांचा आर्थिक उद्धार करणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here