




✒️नायगांव(पुरोगामी न्युज नेटवर्क)
नायगांव बाजार(दि .११ मार्च):- सामाजिक बांधिलकी जोपासणारे आपल्या मनमिळावू स्वभावाचे अत्यंत कमी वयात आपल्या व्यवसायासह, सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक क्षेत्रात कुठलीही प्रसिद्धी न करता उल्लेखनीय कामगिरी करून नायगांव तालुक्यात आपला ठसा उमटविणारे, विनय रमेश पाटील कल्याण म्हणजे एक मनमिळावू स्वभावाचे प्रसिद्ध युवा उद्योजक, म्हणून नावारूपास आलेले एक दिलदार मनमिळावू व्यक्तीमत्व आहेत, असं प्रतिपादन मातृछाया जनसेवा फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी केले आहे.
विनय रमेश पाटील कल्याण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शाल श्रीफळ पुष्पहार मिठाई भरून मातृछाया जनसेवा फाउंडेशनच्या वतीने शिवानंद पांचाळ, गौतम वाघमारे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा उद्योजक गजानन सुरेशराव पाटील कल्याण , सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील कल्याण, पत्रकार शिवाजी कुंटूरकर सह आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




