



🔹साल्वंट कंपनीचे संचालक निलेश मोहता यांची पत्रकार परिषदेत माहिती
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.11मार्च):- येथील नगर परिषदेचे नगरसेवक तथा नियोजन समिती सभापती महेश भरै यांनी प्रसारमाध्यमातून रामदेव बाबा साल्वंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संदर्भात जे आरोप केलेत त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून त्यांनी केलेले हे आरोप बिनबुडाचे आहेत अशी माहिती दिनांक 10 मार्च 2022 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देताना रामदेव बाबा सल्वंट कंपनीचे संचालक निलेश मोहता यांनी नगरसेवकांच्या त्या आरोपांचे खंडन केले आहे.
ब्रह्मपुरी पासून जवळच उदापूर ते बोरगाव रस्त्यावर रामदेवबाबा साल्वंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे पर्यावरण विभागाच्या निर्देशानुसार ही कंपनी योग्य पद्धतीने कार्य करत असून शासनाच्या निर्देशांचे पालन योग्य पद्धतीने कंपनीकडून होत आहे मात्र काही राजकीय पुढारी स्वहितासाठी साल्वंट कंपनीला प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून बदनाम करीत आहेत या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या विनापरवाना अवैद्य बांधकाम करण्यात आलेला नसून वेळोवेळी माहिती घेऊनच बांधकाम करण्यात आलेले आहे वाढीव बांधकामासाठी दिनांक 9/11/2021 ला परवानगी अर्ज नगर परिषदेकडे प्रस्ताव सादर सादर केलेला आहे नगर रचनाकार चंद्रपूर व नगर परिषदेच्या नियमाप्रमाणे सदर जागेचा लेआउट मंजूर करण्यात आलेला आहे.
शिवाय उदापूर गावात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन कंपनीच्या सीएसआर फंडातून शुद्ध पाण्यासाठी आरो मशीन बसवण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे तसेच झिलबोडी गावात पाण्याची टाकी व बोरवेलचे काम हाती घेऊन सी एस आर फंडामधून कंपनी काम करीत आहे कंपनीकडून आजतागायत कोणत्याही प्रकारचा गैर प्रकार घडला नसून तक्रारदार यांनी पूर्वग्रह दुषीत भावनेतून कंपनी विरोधात बदनामी करण्याचे कट कारस्थान रचले आहे त्यामुळे हे प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झालेले बातम्यातून कंपनीची विनाकारण होणारी बदनामी हा गैर प्रकार असून ज्यांनी हे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत त्यात कोणत्याही प्रकारचे तत्थ नसून मी निलेश मोहता रामदेव बाबा साल्वंट कंपनीचा संचालक असल्यामुळे सदर नगरसेवकांनी केलेल्या त्या आरोपाचे खंडन पत्रकार परिषदेतून करीत आहे.


