Home महाराष्ट्र नाभिक समाजाकडून राज्यमंत्री दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध

नाभिक समाजाकडून राज्यमंत्री दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध

89

🔺14 मार्चला ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व सलून बंद

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.11मार्च ):-केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी 6 मार्चला जालन्या मध्ये झालेल्या चर्चासत्रात राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना तिरुपती बालाजी येथील न्हाव्ह्यांची उपमा देऊन नाभिक समाजाचा अपमान केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याने राज्यमंत्री दानवे यांचा निषेध करण्यासाठी 14 मार्च सोमवार ला ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व सलून व्यवसाय बंद ठेवून उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई करुन नाभिक समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निषेध निवेदन पाठविण्यात येणार आहे.

दरम्यान 14 मार्चला ब्रम्हपुरी येथील संत शिरोमणी नगाजी महाराज देवस्थान येथे सकाळी 10 : 00 वाजता ब्रम्हपुरी तालुक्यातील नाभिक समाज एकत्र आल्यानंतर मुकमोर्चा काढत उपविभागीय कार्यालयाकडे नेण्यात येईल. तत्पूर्वी पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे गुन्हा नोंदवण्यात येईल.

नाभिक समाजावरील वारंवार होणाऱ्या अन्यायाची बदनामी कायमस्वरुपी दूर सारण्यासाठी , नाभिक समाजाला आट्रासिटी ॲक्ट च्या अंतर्गत संरक्षण मिळावे म्हणून,समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी ब्रम्हपुरी तालुक्यातील सर्व नाभिक समाज बांधवांनी नेहमी प्रमाणे नाभिक समाजाची एकता दाखवून आपापले सर्व सलून व्यवसाय बंद ठेवून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ब्रम्हपुरी नाभिक समाजाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ.अशोक सालोटकर , नाभिक युवा आघाडी चे मुख्य मार्गदर्शक अजय खळशिंगे, मार्गदर्शक प्रा.लक्ष्मण मेश्राम, नाभिक युवा आघाडी चे अध्यक्ष लक्ष्मीकांत फुलबांधे, नाभिक युवा आघाडीचे माजी अध्यक्ष विलास सुर्यवंशी ,उपाध्यक्ष विलास दाणे,श्रावण येळणे,सचिव सुनील मेश्राम, सहसचिव मयूर मेश्राम, प्रवक्ते पितांबर फुलबांधे,प्रसिद्धी प्रमुख विनोद मेश्राम, महिला आघाडी च्या अध्यक्षा रजनी सुर्यवंशी, सचिव रश्मी पगाडे,सलुन असोसीएशनचे अध्यक्ष सुरज कुंडले, सचिव मोरेश्वर मेश्राम आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here