Home महाराष्ट्र प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची पालघर जिल्हा कार्यकारिणी जाहीर

75

✒️पालघर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पालघर(दि.11मार्च):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली व पालघर जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे यांच्या मार्गदर्शनानुसार पालघर जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.पालघर जिल्हा कार्यकारिणी अशी : जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अमेय पिंपळे, जिल्हा समन्वयक श्री.अतुल वझे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. संतोष कोरे, जिल्हा कोषाध्यक्ष श्री. जितेंद्र सावे, जिल्हा सरचिटणीस श्री. मुकेश सिंह, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख श्री.परेश संखे, जिल्हा सहसचिव श्री.संजोग संखे, पालघर तालुका महिलाध्यक्षा सौ.उज्वला जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पालघर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने गेल्या दोन वर्षात विविध उपक्रम राबवून पत्रकार व सामान्य कुटुंबांना मदत केली आहे. सन २०२२-२३ मध्ये पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडवणे, सामान्य कुटुंबांना मदत करणे, वृक्षारोपण, पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेश संखे यांनी सांगितले.

पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू ,युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख सुर्यकांत ताद लापूरकर, संघटक साहेबराव कोळंबिकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, विदर्भ अध्यक्ष विजयकुमार बुंदेला, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर, कोकण उपाध्यक्ष, योगेश भामरे, इल्यास पठाण, कोकण सरचिटणीस महेश महाजन, पंडित फंगाळ, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे, ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here