




✒️सिरसाळा प्रतिनिधी(अतुल बडे)
सिरसाळा(दि.1मार्च):-महाराष्ट्र एच एच सी बोर्ड औरंगाबाद मार्फत घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षा सूरू असतानाच सिरसाळा येथील अर्जूनेशवर महाविद्यालयात आज फिजिक्स च्या पेपरला शिक्षक पर्यवेक्षक यांच्या मध्यस्थीने कॉपिचा सुळसुळाट होताना दिसत असल्याची माहिती सिरसाळा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांना समजल्यानंतर त्यांनी स्वतः सेंटर वर जाऊन भेट घेतली असता शिक्षक पर्यवेक्षक यांच्या मध्यस्थीने कॉपी चा सुळसुळाट सूरू असताना दिसला असल्याने सर्व कॉपीचा कट उधळून लावत पोलिस कर्मचारी यांनीच स्वतः कॉप्या पकडल्याने शिक्षक पर्यवेक्षक यांचे धाबे दणाणले असुन संबंधित कॉलेज वर वरिष्ठांना अहवाल पाठवून कार्यवाही करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले




