



✒️कारंज (घाडगे)प्रतिनिधी(पियुष रेवतकर)
कारंजा(घा)(दि.11मार्च):-कारंजा येथे प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई यांना अभिवादन. कारंजा शहरातील ए .आर .सी पब्लिक स्कूल तर्फे सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शिक्षक जीत दुपारे उपस्थित होते . सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षाला प्रेरणा समजून मुलींनी स्वतः मजबुत वाहायला पाहिजे असे मत शाळेच्या उपमुख्यधापिका सारिका सातपुरे यांनी व्यक्त केले .तसेच या स्मृतीदिनानिमित्य आयोजित कार्यक्रमा मध्ये कारंजा शहरातील युवक पियुष रेवतकर वक्तृत्व स्पर्धेत राज्यातून प्रथम आल्या बद्दल त्यांना ए .आर .सी पब्लिक स्कूल येथे आमंत्रित करून त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
या अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा मनवर यांनी केले तर आभार बुशरा पठाण यांनी मानले .या वेळी शाळेच्या मुख्यधापिका सारिका सातपूरे ,शाळेच्या एमडी सारिका नासरे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष जीत दुपारे ,किसन मात्रे ,अमोल केलझलकर ,उमेश साठवणे, नेहा चौधरी ,सरोज मॅडम ,बुशरा पठाण ,स्नेहा मनवर ,आकांशा यादव ,प्रदीप उके , ललित मस्के ,सत्कारमूर्ती पियुष रेवतकर , शाळेतील शिक्षकेतर व विद्यार्थी या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते .





