




✒️अतुल बडे(सिरसाळा प्रतिनिधी)
सिरसाळा(दि.11मार्च):- पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी ठिकठिकाणी दारूवर कारवाई केली चार ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये हजारोंची दारू जप्त करण्यात आली आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीतील रेवली शिवारातील हॉटेल साई बाबा येथे 2700 रुपयांचया दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या या प्रकरणी पोलीस शिपाई अर्शद सय्यद यांच्या फिर्यादीवरून सुधाकर ज्ञानोबा मुंडे यांच्याविरुद्ध दाखल झाला आहे दुसरी कारवाई सिरसाल्यातील परळी रोडवरील हॉटेल रजविरच्या पाठीमाघे करण्यात आली या ठिकाणी 7200 रुपयाची दारू जप्त करून पोलीस अमलदार संतराम थापडे यांच्या फिर्यादीवरून रामचंद्र मानिकराव बंडगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई सिरसाळा परळी रोड हॉटेल साई पॅलेस मध्ये करण्यात आली या ठिकाणी 5100 रूपयांचा माल जप्त करून पोलीस अमलदार अक्षय देशमुख यांच्या फिर्यादीवरून कलावती न्यानेश्वर कावळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे चौथी कारवाई बीड परळी रोडवरील खामगाव शिवारातील स्वप्नील ढाबा येथे करण्यात आली या ठिकाणी 7180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अर्शद सय्यद यांच्या फिर्यादीवरून संतोष चौरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अश्या एकुण चार कार्यवाही मध्ये सिरसाळा पोलिसांना 22180 रूपयांचा मुद्देमाल पकडण्यात यश आले आहे ह्या धडाकेबाज कार्यवाही मुळे अवैध धांद्यावल्याची झोप उडाली असुन सिरसाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप एकशिंगे यांची सर्वत्र कौतुक होत आहे




