



🔸गेवराई येथील हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114
बीड(दि.10मार्च):- जिल्ह्य़ातील मग्रारोहयो अंतर्गत कंत्राटी कर्मचारी पंचायत समिती कार्यालयात विविध पदावर कार्यरत असुन नरेगा योजनेंतर्गत काम करत असताना सदर योजना ग्रामपंचायत स्तरावर एकाच कामासाठी तसेच मजुरांस रोजगार मिळण्याकरीता कंत्राटी कर्मचारी ऑनलाइन कामकाज, मोजमाप घेणे असे नरेगा विषयक कामकाज पाहत असताना आधिक लोकसंपर्क असल्यामुळे यामध्ये विकृतबुद्धीचे लोक संपर्कात येऊन या कंत्राटी कर्मचा-यांशी वादविवाद घालतात, शिविगाळ करतात, वस्तुंची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी देतात या प्रमाणात वाढ होत असून कर्मचा-यांमध्ये भितीचे वातावरण झाले आहे.
गेवराई येथील हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल
____
पंचायत समिती गेवराई येथील सहाय्यक कार्यक्रम आधिकारी, नरेगा कक्ष पंचायत समिती गेवराई, नितिन बाबासाहेब तोगे, डाटा एन्ट्री ऑपरेटर नरेगा कक्ष पंचायत समिती गेवराई अमीरोद्दीन अलीमोद्दीन शेख यांच्यावर दि.०९ मार्च २०२२ रोजी पंचायत समिती गेवराई येथे हल्ला करण्यात आला होता त्यासंदर्भात हल्लेखोर कैलास माने व गजानन काळे यांच्याविरूद्ध भारतीय दंडसंहीता १८६० कलम ३५३ ,३४१ ,२६९ ,१८८ ,१४९ ,१४७ ,१४३ ,१४१ ,१२० ब अन्वये गुन्हा नोंद करण्यात यावी अशी लेखी तक्रार अजित पवार (भा. प्र.से. )सहजिल्हाकार्यक्रम समन्वयक तथा मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड यांनी पोलीस निरीक्षक पोलिस ठाणे गेवराई यांना दिली आहे.





