Home महाराष्ट्र शासकीय आयटीया येथे महिला दिन साजरा*

शासकीय आयटीया येथे महिला दिन साजरा*

64

✒️कारंजा(घा)प्रतिनिधी(पियुष रेवतकर)

कारंजा(घा)(दि.10मार्च):-शहरातील शासकीय आयटीया मध्ये जागतिक महिला दिन साजरा . औद्योगिक प्रशिक्षण संस्था कारंजा येथे जागतिक महिला दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला .संबंधित कार्यक्रमात विभागातील सर्व मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाकरिता परिसरातील प्रथितयश व कर्तुत्ववान महिला यांचा प्रमुख पाहुणे म्हणून संगीता कामडी मॅडम ,प्रज्ञाताई पचपोहर ,यावले मॅडम तसेच पूजा हिरडकर पोलीस स्टेशन कारंजा यांचा सक्रिय सहभाग होता.

सदर कार्यक्रमात वकृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा इत्यादी उपक्रमाद्वारे कार्यक्रम साजरा करण्यात आला.याप्रसंगी विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. उपरोक्त कार्यक्रमास श्री धूर्वे सर,देशमुख सर,पडोळे सर डांगोरे सर तायडे सर ,साने मॅडम,श्री शिरपूरकर व श्री वाघाये सर,त्याच प्रमाणे आकाश सारसर ,सामाजिक कार्यकर्ते उमेश पाचपोहर ,पियुष रेवतकर यांचे मार्गदर्शन लाभले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here