




🔹गंगाखेडला सेवाभावी संस्थेचा उपक्रम
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.10मार्च):-ईयत्ता सातवी ते नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना आरोग्य विषयक समुपदेशन करत त्यांना आरोग्यदायी वस्तू भेट देवून क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांना स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. साई सेवा प्रतिष्ठाण आणि सवंगडी कट्टा या सेवाभावी संस्थांच्या वतीने शहरातील व्यंकटेश विद्यालयात हा ऊपक्रम राबवण्यात आला.
आज सकाळी ९ वाजता विद्यालयातल्या सभागृहात सावित्रीबाई फुले यांना स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. डॉ. भाग्यश्री भरड, डॉ. प्राची भरड, माजी नगरसेविका सौ. वर्षा गोविंद यादव, सौ. माया रमेश औसेकर, धारखेडच्या सरपंच सौ. आशा मुंजाजी चोरघडे, मुख्याध्यापीका सौ. सीमा बाळासाहेब राखे आदिंची याप्रसंगी प्रमुख ऊपस्थिती होती.
डॉ. भाग्यश्री भरड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तर डॉ. प्राची भरड यांनी विद्यार्थीनींना आरोग्यविषयक मार्गदर्शन करत समुपदेशन केले. यानंतर विद्यार्थीनींना साई सेवा प्रतिष्ठाण आणि सवंगडी कट्टा समुहाच्या वतीने आरोग्यदायी वस्तू भेट देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माया औसेकर, सुत्रसंचालन प्रा. सुरेखा भोईबार यांनी तर आभार प्रदर्शन सौ. ज्योती भागवत यांनी केले. गोविंद यादव, रमेश औसेकर, व्यंकटेश विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बाळासाहेब राखे, मुख्याध्यापक करपुडे सर, गुंडेराव देशपांडे, मनोज नाव्हेकर, भगत सुरवसे, महेंद्र वरवडे आदिंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.




