Home महाराष्ट्र हदगाव पोलीसांची दमदार कामगिरी चोरट्यांस मुद्देमालासह अटक

हदगाव पोलीसांची दमदार कामगिरी चोरट्यांस मुद्देमालासह अटक

68

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव प्रतिनिधी)

हदगाव(दि.10मार्च):- शहरातील मंडप डेकोरेशन चे सामान चोरुन नेलेल्या आरोपीस हदगाव पोलीसांकडून अटक करण्यात आली असून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन हदगाव गुरनं ८५/२०२२ कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व चोरटयास मुद्देमालासह अटक करण्यात आली

सविस्तर वृत्त असे की,हदगाव शहरातील आझाद चौक येथील प्रल्हादराव यादवराव क-हाळे वय ५२ वर्षे व्यवसाय मंडप डेकोरेशन रा. आझाद चौक, दत्तबड़ी रोड हदगाव यांनी पो.स्टे. ला फिर्याद दिली.दिनांक २८/२/२०२२ रोजी चे रात्री ०१.ते ०६. या. दरम्यान त्यांचे मंडप डेकोरेशन चे सामान लोखंडी पाईप १५ नग लोखंडी मोठा तावा, लोखंडी शिडी हे अज्ञात चोरटया ने चोरून नेल्याची फिर्याद दिल्याने पोलीसांनी तात्काळ गुरनं ८५/२२ कलम ३७९ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद होताच मा.पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मा. अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी संजनकर उप विभाग भोकर, यांचे मा.श्री हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हदगाव यांनी मार्गदर्शन घेवुन गुन्हयाचे तपासिक अमलदार पोहेको विश्वनाथ हंबडे यांना तपासाबाचत सुचना देवून वेगाने चक्र फिरविले व गोपनिय माहीतीच्या आधारे आरोपी राजकुमार गांजीलाल जयस्वाल रा.आझाद चौक. हदगाव यास दिनांक ०९/०३/२०२२ रोजी पकडून त्यास जेरबंद केले व त्यास पोलीस हिसक्या दाखवला त्याचे कडुन चोरून नेलेला माल मंडप डेकोरेशनचे लोखठी पाईप, लोखंडी मोठा तावा, लोखंडी शिडी हस्तगत केले आहे. सदर ची कामगिरी तपासिक अमलदार पाहेको विश्वनाथ हबर्डे, होमगार्ड अधिकारी गणेश गिरबिडे, गणेश माळोदे यांनी पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here