Home महाराष्ट्र नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात साविञीबाई फुले पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात साविञीबाई फुले पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

89

🔸साविञीबाईच्या धैर्य,चिकाटी,संयमामुळे महिला घडल्या – प्राचार्य डाॅ. कोकोडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.10मार्च):-” प्रस्थापितांच्या विरुध्द साविञीबाई फुलेंनी लढा उभारुन महिलांच्या आत्मसन्मानासाठी शेणमाती,दगडधोंडेही पेलले.स्ञी शिक्षणाच्या मुहर्तमेढीचा झेंडा रोवला.जोतिरावांच्या साक्षीने त्यांनी महिलांना खरे साक्षर केले, यामुळे आजची महिला उंच भरारी घेते आहे,याला खरे कारण साविञीबाईचे धैर्य, चिकाटी आणि संयम आहे “असे बहुमोल विवेचन प्राचार्य, डॉ एन एस कोकोडेंनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात साविञीबाई फुले पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते.

सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कोकोडे,उपप्राचार्य डाॅ डी एच गहाणेंनी साविञीबाईंच्या फोटोला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केलीे.याप्रसंगी डॉ रेखा मेश्राम,डॉ राजेंद्र डांगे,डॉ असलम शेख,डाॅ धनराज खानोरकर, डॉ सुभाष शेकोकर,डाॅ मोहन कापगते,डाॅ भाष्कर लेनगुरे,डॉ सुनिल चौधरी,डाॅ पद्माकर वानखडे, डॉ अरविंद मुंगोले, डॉ रतन मेश्राम,डाॅ ठावरी, डॉ दर्शना उराडे,डाॅ नाकतोडे, अधीक्षक संगीता ठाकरे,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारींनी साविञीबाईंच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ धनराज खानोरकरांनी केले. यशस्वीतेसाठी डॉ युवराज मेश्राम,प्रा रुपेश वाकोडीकर,जगदिश गुरूने, प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here