




🔹जय्यत तयारी : कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
गेवराई(दि.10मार्च):-येथील प्रसिध्द दारुल उलूम निजामिया रजवियाचा वार्षिक जलसा व जश्ने दस्तारबंदी कार्यक्रम शनिवारी (दि. 12) आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून या कार्यक्र मास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दारुल उलूम निजामिया रजवियाचा जलसा व जश्ने दस्तारबंदी समारंभ शनिवारी
दारु ल उलूम निजामिया रजविया व रजाकाराने अहेले सुन्नत वल जमात गेवराईच्या वतीने आयोजित जलसा व जश्ने दस्तारबंदी कार्यक्रम शनिवारी सायंकाळी सात ते रात्री साडे आकराच्या दरम्यान हाफिज सय्यद महेबूब साहब यांच्या अध्यक्षतेखाली रजा नगर (संजय नगर) येथे संपन्न होणार असून हजरत मुफ्ती सय्यद मोहम्मद रिजवान साहब रिफाई (कोकण) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याप्रसंगी मौलाना मोहम्मद अन्सार अहमद मिस्बाही, मौलाना मोहम्मद नूरुलहुदा साहब, सय्यद जमील साहब कादरी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यावेळी कुराण हाफिज बनलेल्या मोहम्मद फिरोज व रहमत रसूल यांचा दस्तारबंदी कार्यक्रम संपन्न होणार आहे.




