Home महाराष्ट्र भगवती देवी विद्यालयाच्या जिजाऊ यशाच्या मानकरी

भगवती देवी विद्यालयाच्या जिजाऊ यशाच्या मानकरी

66

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.10मार्च):- बसवेश्वर अभ्यासिका उमरखेड येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तव्यदक्ष 60 महिलांचा पार्वती एज्युकेशन मार्फत सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पार्वती ग्रुप मार्फत काही दिवसापूर्वी सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव निबंध लेखन व वकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.त्यामध्ये भगवती देवी विद्यालय, देवसरी येथून 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये निबंध स्पर्धेत कु. देवीका ओमशिवाजी देवसरकर वर्ग 10 वा हिने प्रथम क्रमांक पटकावला तर कु. सानिका विनायकराव शिंदे वर्ग 9 वा हिचा वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.

या जिजाऊचा सत्कार पुष्पगुच्छ ट्रॉफी प्रमाणपत्र व प्रत्येकी 1000 रुपये रोख रक्कम देऊन येथेच्छ सन्मान करण्यात आला.ह्या दोन्ही विद्यार्थ्यांनी यशाच्या मानकरी ठरल्या बद्दल विद्यालयात त्यांना पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक साहेब श्री प्रल्हादराव मिरासे व शिक्षक वृंद प्रकाशराव कदम, दिनेश वान्नरे, दिगंबर माने, अनिल अल्लडवार, भागवत कबले, मारुती महाराज, अरविंद चेपुरवार, भागवतराव जाधव यांनी त्यांचे खूप खूप अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस या जिजाऊना शुभेच्छा दिल्या व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पार्वती एज्युकेशन मार्फत प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे पार्वती एज्युकेशन ग्रुप सध्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ठसला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here