Home महाराष्ट्र हरडफ तेथे शालेय व्यवस्थापन समिती स्थापन

हरडफ तेथे शालेय व्यवस्थापन समिती स्थापन

93

🔹अध्यक्ष पदी स्मिता सूर्यवंशी उपाध्यक्षपदी अमोल कदम यांची बिनविरोध निवड

✒️सिद्धार्थ वाठोरे(मो.9373868284)हदगाव(नांदेड),प्रतिनिधी

हदगाव(दि.9मार्च):- तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा हरडफ येथे दि.९ रोजी शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली
जि.प.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखालील ही निवड करण्यात आली असून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ. स्मिता सूर्यवंशी तर उपाध्यक्षपदी अमोल कदम यांची तर सदस्य पदी पुंजाराम चव्हाण अरविंद कदम देविदास निलेवार अंकुश चौरे आकांक्षा वायवळ विनायक जाधव अमोल मोरे यांची सदस्यपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्गातील पटसंख्येनुसार संवर्ग निहाय सर्वानुमते निवड केली सर्व पालकांच्या समक्ष खेळीमेळीच्या वातावरणात शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली वर्ग पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा मधून पालकांची निवड करण्यात आली सुत्रसंचलन विठ्ठलवाढ सर यांनी केले व शालेय व्यवस्थापन समितीचे कार्य व नियम वाचून दाखवले शाळेचे मुख्याध्यापक यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य यांचे शब्द सुमनाने व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
पालक सभा यशस्वी होण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच वंदना वाठोरे माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील हाडपकर तंटामुक्ती अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी सुनिल पाटील रामजी विठ्ठल सुर्यवंशी व शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी मदत केली अत्यंत आनंदात व उत्साही वातावरणात शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here