



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
चंद्रपूर(दि.9मार्च):-जागतिक महिला दिना निमित्त चंद्रपूर शहरातील गौतम नगर येथे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री प्रज्वलंत कडू व बाबुपेठ मंडळ उपाध्यक्ष पंकज निमजे यांच्या नेतृत्वात विधवा व निराधार महिलांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज पोतराजे, आशिष ताजणे माधुरी टेकाम, देवा बुरडकर, नितीक्षा मुन, अजय वाकडे, विशाल पेरगे,सुलभा वैरागडे, गगन गोवर्धन, विशाखा गंधमवार,हे मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अतुल मून यांनी केले तर आभार प्रदर्शन माधुरी टेकाम यांनी केेले


