Home बीड विजेचा करंट लागून आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

विजेचा करंट लागून आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

60

🔹ऊसतोड कामगारांची मुलं हे आजी-आजोबांच्या ताब्यात

🔸पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतरला

🔸गेवराई तालुक्यातील गोळेगाव तांडा येथील घटना

✒️जिल्हा प्रतिनिधी,बीड(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.9मार्च):-लहान मुलासोबत खेळत असताना एका आठ वर्षांच्या बालकाचा पत्र्याच्या शेडला हात लागला आणि करंट लागून त्या बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील गोळेगाव तांडा येथे घडली. आदेश राठोड बालकाचे नाव आहे. घराच्या अंगणात मुलांसोबत खेळण्यात दंग असलेल्या आदेशाचा अचानक पत्र्याच्या शेडला हात लागला. त्या पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतरला होता, पण हे कळण्याअगोदरच आदेश जागीच कोसळला.

आदेश राठोड हा गोळेगाव तांडा येथे राहतो त्याचे आई-वडील ऊसतोड कामगार आहेत आणि ते ऊस तोडणीच्या कामासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले आहेत. आदेश आणि त्याचा भाऊ हे आजी आजोबा यांच्याकडे शालेय शिक्षण घेण्यासाठी ते राहत होते.

सकाळी इतर मुले खेळत असताना आदेशचा हात अचानक त्यांच्या पत्र्याच्या शेडला लागला आणि आदेश राठोड याचा जागीच मृत्यू झाला आहे. आजूबाजूचे लोक त्या वेळेस धावत आले, पण नेमके काय झाले हेच कुणाला कळले नाही आणि क्षणार्धात आदेश खाली कोसळला तो पुन्हा उठलाच नाही. दरम्यान आई वडील आल्यानंतर उशिरा आदेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..

ऊसतोड कामगारांची मुलं हे आजी-आजोबांच्या ताब्यात
बीड जिल्ह्यातील बहुतांश लोक ऊस तोडणी करण्यासाठी परराज्यात आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात दरवर्षी जात असतात. म्हणजे वर्षातील किमान चार ते सहा महिने हे ऊस तोड मजूर आपल्या मुलांपासून घरापासून दूर ऊसाच्या फडावर राहतात. या दरम्यान यातील बहुतांश ऊसतोड कामगारांची मुलं ही त्यांच्या आजी-आजोबांसोबत गावी राहतात आणि त्यामुळे वयस्कर आजी-आजोबा या लहान मुलांचे संगोपन करतात. आदेश आणि त्याचा भाऊ सुद्धा आजी-आजोबांकडे राहायचे

पत्र्याच्या शेडमध्ये करंट उतरला आदेश इतर मुलासोबत खेळत असताना त्याचा हात पत्र्याच्या शेड लागला, पण त्या पत्र्याच्या शेडमध्ये करंट आहे याची कल्पना तिथे कोणालाच नव्हती. त्यामुळे अचानक पत्र्याच्या शेडमध्ये करंट कसा उतरला हे कळू शकले नाही. करंट लागून आदेश जमिनीवर कोसळल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला. पण विजेचा धक्का इतका जोरात बसला होता की आदेश पुन्हा जागेवरुन उठू शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here