Home महाराष्ट्र आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांमुळे देविदास ब्राह्मणे यांच्यावर मोफत हृदय शस्त्रक्रिया !

आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नांमुळे देविदास ब्राह्मणे यांच्यावर मोफत हृदय शस्त्रक्रिया !

172

🔸१० लक्ष रुपयांची मोफत शस्त्रक्रिया ; ब्रह्मणे कुटुंबाला मिळाला दिलासा !

✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.9मार्च):- विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार हे मतदार संघामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतांना दिसून येतात. ते सातत्याने नाविन्यपूर्ण काम करण्यात अग्रेसर असतात. अशीच त्यांच्याकडे आरोग्याचा विषय घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला नेहमी सहकार्य करतांना दिसत असून रुग्णसेवेला प्राधान्य देऊन रुग्णांना दिलासा देण्याचे काम आमदार देवेंद्र भुयार करत आहे.वरुड तालुक्यातील धनोडी ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री देविदास ब्राह्मणे यांची दहा लक्ष रुपयांची हृदय शस्त्रक्रिया आ. देवेंद्रजी भुयार यांचे माध्यमातून जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे मोफत करण्यात आली असून मुंबई येथे पुढील उपचार सुरू आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या रुग्णसेवेमुळे देविदास ब्राह्मणे यांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळाल्याने जसलोक हॉस्पिटल मुंबई
येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली या मोफत शस्त्रक्रियेने धनोडी ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री देविदास ब्राह्मणे यांना नवे आयुष्य मिळाले.देविदास ब्रह्मणे यांना हृदयाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याकरिता १० लक्ष रुपयांचा खर्च होणार असल्यामुळे रुग्णाच्या कुटुंबीयांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क केला असता आमदार देवेंद्र भुयार यांनी देविदास ब्रह्मणे यांच्या तब्बेतीची दखल घेऊन क्षणाचाही विलंब न करता तात्काळ जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे ऍडमिट करून १० लक्ष रुपयांची हृदयाची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून देविदास ब्रह्मणे यांना जसलोक हॉस्पिटल मुंबई येथील नामांकित रुग्णालयात दाखल करून सर्व उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी जसलोक हॉस्पिटल मुंबई येथे जाऊन देविदास ब्राह्मणे यांची भेट घेऊन झालेल्या शास्त्रक्रियेबद्दल माहिती घेऊन भेट घेतली आता देविदास ब्राह्मणे ठणठणीत बरे होत असून पुढील उपचार मुंबई येथे सुरू असल्यामुळे ब्राह्मणे कुटुंबाला दिलासा मिळाला. आमदार देवेंद्र भुयार यांच्या या जागरूक पणामुळे फार मोठा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे ब्राह्मणे परिवाराने आमदार देवेंद्र भुयार, रुग्णसेवक पंकज ठाकरे यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here