Home महाराष्ट्र केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द उदगारल्याबद्दल गेवराई नाभिक संघटनेच्या...

केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द उदगारल्याबद्दल गेवराई नाभिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध

302

🔹गेवराई चे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना दिले निवेदन

✒️नवनाथ आडे(गेवराई प्रतिनिधी)

गेवराई(दि.9मार्च):-केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द उदगारल्याबद्दल त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने गेवराईचे तहसीलदार यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले,नाभिक समाज पोटाची खळगी भरण्यासाठी पारंपारिक सलून व्यवसाय करतात राजकीय क्षेत्रात भाषण करताना दानवे यांनी नाभिक समाजाची बदनामी केली आहे,सदर निवेदनात म्हटले आहे की,रावसाहेब दानवे त्यांनी केलेल्या गंभीर गुन्ह्याबाबत त्याच्यावर केंद्रीय राज्यमंत्री पदावरून हकालपट्टी करण्यात यावी व ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत निवेदन दिलेले आहे.

समस्त गेवराई नाभिक समाजाकडून सदर घटनेचा निषेध केला जात आहे,याप्रसंगी सुनील पोपळे,शंकरराव सुर्यवंशी,नानासाहेब पंडित,उतमराव सोलाणे,ज्ञानेश्वर चातुर,नागेश पंडित,रमेश राऊत,दशरथ पंडित,कृष्णा पंडित,राजाभाऊ वखरे,ज्ञानेश्वर पंडित,रामेश्वर राऊत,सुधाकर गोरे,गणेश पंडित,कैलास खंडागळे,ह.भ.प.राजेंद्र (महाराज)पंडित,राहुल राऊत,सुरेश काशिद, बाळासाहेब आतकरे,राहुल वखरे,राहुल पंडित,अशोक राऊत,हरि पंडित,दता राऊत,शिवाजी वाघमारे,ओम छेडीदार,उमेश वखरे,गोटु वाघमारे,राजाभाऊ राऊत,विजय पंडित,सचिन पंडित,महेश सुरवसे,कृष्णा शिंदे,बाळु चातुर,बापू राऊत,आहीलाजी काळे,बप्पासाहेब काळे,बाबुराव पवळे,कांतीलाल छडीदार,हरिओम पंडित,आशोक वखरे आप्पासाहेब पंडित,तुळशीराम आतकरे,सुदामराव पंडित,चंद्रकांत पंडित,सचिन काळे,साळीकराम काळे,अशोकराव गायकवाड,सुनील गायकवाड,सचिन राऊत साईनाथ वखरे राऊत,वाघमारे, पंडित,पोपळे,चातुर,वखरे,काशिद, छेडेदार,खंडागळे.सुर्यवर्शी,कोकणे इत्यादी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here