



🔹AIMIM पक्षाचा विस्तार महिला शहर व तालुका कार्यकारणी गठित लवकरच कोरपना,जिवती येथे सभेचे आयोजन
✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)
जिवती(दि.9मार्च):–मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात AIMIM या राजकीय पक्षाचा विस्तार चद्रपूर जिल्ह्यासह राज्यात देशात दिवसेंदिवस वाढत असून गडचांदूर शहरात नुकतीच इतर राजकीय पक्षाला सोडून महीलाचा एक मोठा गट पक्षात सामील झाल्याने इतर राजकीय पक्षाच्या भोवया उंचावल्या असून राजकीय पक्षात विविध चर्चेला उधाण आले आहे.
कोरपना,राजुरा तालुक्यातील गडचांदुर्,नांदा फाटा, डेवाडा, येरगव्हान येथे पक्ष कार्यकारणी स्थापन झाली असून लवकरच जिवती, पिपरडा,कोरपना,पाटण,शेंनगावं,मरकागोदी,येथे पक्ष कार्यकारणी स्थापना होणार असून कोरपना तालुका अध्यक्ष पदी सौ.शमा शब्बीर शाह,तर उपाध्यक्ष सौ.गीताबाई तेलतुंबडे तर गडचांदुर शहर अध्यक्ष अर्शिया पठाण,उपाध्यक्ष आशू इलियास पठाण,सचिव मयरूम रहीम शेख, याची बिन विरोध निवड करण्यात आली तर गडचंदुर् युवा आघाडी अध्यक्ष मैनु बेग,तर उपाध्यक्ष तोसिफ सादिक अली,सचिव युसुफ नइम शेख याची सर्वानुमते निवड तालुका अध्यक्ष मो.रफिक शेख यांनी केली सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले यासाठी पत्रकार नासीर खान,शेख कादर भाई शेख,शहर अध्यक्ष मुनाफ शेख,उपाध्यक्ष रऊफ शेख,सचिव सोहेल शेख ,संघटक शब्बीर शहा,कासिम अली,आदींनी अथक परिश्रम घेतले रफीक शेख कोरपना तालुका अध्यक्ष यांनी माहिती दिली


