Home महाराष्ट्र बिटरगाव ते ढाणकी रस्त्यासाठी रस्ता रोको-उपविभागीय अभियंता ला धरले धारेवर

बिटरगाव ते ढाणकी रस्त्यासाठी रस्ता रोको-उपविभागीय अभियंता ला धरले धारेवर

310

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी विशेष)

बिटरगाव(दि.9मार्च):– अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ढाणकी बिटरगाव रस्त्यासाठी आज जुन्या सावळेश्वर पांदन रस्ता जवळ समस्त बिटरगाव परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून उपविभागीय अभियंता यांना धारेवर धरले व प्रशासनाचा निषेध केला.बंदी भाग म्हणून ओळखले जाणाऱ्या अकोली,जेवली,पिंपळगाव,मोरचंडी,सोन दावी,गाडी,बोरी, खेर्डी, परोटी या सर्व गावातून कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. आंदोलनस्थळी उपस्थितांनी घोषणाबाजी केली. यावेळी रस्त्यावर चारचाकी व दुचाकी लावून रस्ता दोन तास अडविण्यात आला होता. आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी शोकांतिका व्यक्त करत बांधकाम विभागाचा निषेध केला व उमरखेड येथून आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता चेके यांना धारेवर धरत त्यांच्याशी चर्चा केली व लवकर काम सुरू झाले नाहीतर आंदोलनाचा इशारा दिला.

चेके यांनी यावेळी लेखी आश्वासन दिले मात्र उपस्थितांनी ते स्वीकारले नाही. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, सचिन साखरे, प्रकाश पेंधे, प्रकाश खूपसरे, कल्याणराव पाटील, विनोद मामिडवार, बबलू जाधव, राजू पिटलेवाड, कमलाकर दुलेवाड, भेरूलाल साबळे, प्रकाश तगरे, विजू पाटील, वसंता नरवाडे, भास्कर देवकते, शेख शकील, सुनील काळबांडे, गजानन मेचेवाड, सदानंद बुटले, रत्नाकर शिरगिरे, कृष्णा जुकोन्टवार, कैलास कवडे, पोलीस पाटील नामदेव देवकते, मोहन कोंडेवाड, सुरेश तिवारी, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडावा नाही यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप बोस , रवी गीते, गजानन खरात, अतिश जारंडे , यांनी बंदोबस्त दिला.आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी काही वेळ ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here