




✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.8मार्च):-स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे महिला अध्ययन व सेवा केंद्र, महिला तक्रार निवारण समिती, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी भूषविले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील सिनेट सदस्य गोविंदराव भेंडारकर लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणून ब्रम्हपुरीच्या तहसीलदार उषा चौधरी, कार्यक्रमाच्या आयोजिका तथा संस्थेच्या सदस्या प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे विचारमंचावर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला अध्ययन व सेवा केंद्र तथा महिला तक्रार निवारण समितीच्या समन्वयक तथा समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ.स्निग्धा कांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान.उषा चौधरी यांनी स्त्रीपुरूष समानतेची खरी सुरुवात स्वतःपासून आणि प्रत्येक घरातून व्हायला पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मान.ॲड.गोविंदराव भेंडारकर यांनी महिला आणि अंधश्रद्धा या विषयावर आपले विचार व्यक्त करतांना महिलांमध्ये असलेली भूत, बुवाबाजी, भानामती व इतर थोतांडामधील वैज्ञानिक सत्यता प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखविली आणि महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन विषयक व जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यातील विविध तरतुदी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.देवेश कांबळे यांनी स्त्रीपुरूष समानता, महिला सशक्तीकरण याविषयी भाष्य केले. या कार्यक्रमात आदर्श अमृतकर, अक्षय बरडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. माला कांबळे यांनी केले तर आभार प्रा.भीमादेवी डांगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला अध्ययन व सेवा केंद्र तथा महिला तक्रार निवारण समितीच्या समन्वयक प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे, रा.से. यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेश कोसे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे यांनी अथक प्रयत्न केले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.




