



✒️बडनेरा(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
बडनेरा(दि.9मार्च):-महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्यानिमित्त्याने समाजातील महिलांचे स्थान आणि परिस्थितीनुसार घडणाऱ्या विविध घटना यांची दाखल घेत स्थानिक प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँडमॅनेजमेंट बडनेरा येथील वूमन्स डेव्हलेपमेंट सेल, राष्ट्रीय सेवा योजना आणि रेड रिबीन क्लब तर्फे ८ मार्च रोजी “शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता” या २०२२ च्या थिमवर आधारित “परिसंवाद” कार्यक्रम आणि “पथनाट्य” द्वारे जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला तसेच कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयाद्वारे राष्ट्रीय युवा दिवस २०२२ निमित्त्य घेतलेल्या “पोस्टर आणि मास्क कॉम्पिटिशनचे” बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सादर कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे निलिमा आरज, सिनियर पोलिस इन्स्पेक्टर,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती शहर, प्रा.सौ.मोनिका उमक, संयोजिका, स्वयंसिद्ध उद्योजकता विकास अभियान, डॉ अजय साखरे सर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल अमरावती, श्री. प्रमोद मिसाळ सर, समुपदेशक (ICTC ) डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अमरावती तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी जी हरकुत, डॉ. प्रिती खोडके, डॉ कश्मिरा कासट यांची प्रमुख उपस्थिती लाभली. “परिसंवाद” कार्यक्रमाद्वारे प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित विद्यार्थींनी व महिला प्राध्यापक वर्ग यांच्याशी विविध सायबर गुन्हे, महिला उद्योजिगिता करिता उपलब्ध संधी व माहिती विषयावर संवाद साधला. तसेच डॉ अजय साखरे सर यांनी मुलींना एड्स या गंभीर विषयबाबत मार्गर्दर्शन केले. परिसंवाद कार्यक्रमाअंती रासेयो स्वयंसेवक यांनी जागतिक महिला दिनानिमित्य २०२२ च्या थिमवर आधारित पथनाट्यचे सादरीकरण सुद्धा करण्यात आले. रासेयो स्वयंसेविका कु पूर्वा खरबडे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे आयोजन वूमन्स डेव्हलेपमेंट सेलच्या डॉ. सुजाता म्हस्के आणि रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा अनुराधा इंगोले यांनी प्रा. गायत्री बहिरे, प्रा. अपर्णा खैरकर, प्रा. प्राची ठक्कर आणि प्रा राधिका डहाणे तसेच रासेयो स्वयंसेविका कु. प्रतीक्षा घाटे, कु वैष्णवी सालव, कु आकांक्षा खुणे, कु पूजा सोनोने यांच्या सहकार्याने केले. दरम्यान उपस्थित महाविद्यालयातील महिला प्राध्यापक वर्ग, महिला शिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनींनी कार्यक्रमाला कोविड नियमांचे पालन करीत उत्स्फूर्थ प्रतिसाद दिला.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एस. अली यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष अॉड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव युवराजसिगजी चौधरी, सन्माननिय सदस्य शंकररावजी काळे, नितीनजी हिवसे, सौ. रागिनीताई देशमुख, डॉ. सौ. वैशालीताई धांडे व डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.


