Home चंद्रपूर अंगुलिमाल उराडे यांची महात्मा ज्योतिबा फुले पुरस्काराकरिता निवड

अंगुलिमाल उराडे यांची महात्मा ज्योतिबा फुले पुरस्काराकरिता निवड

87

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9मार्च):-“कला फाऊंडेशन” पिंपळोद, ह्या संस्थेच्या वतीने मुल तालुक्यातील बेंबाळ गावचे तथा मागील ११ वर्षापासून सावली तालुक्यातील जांब (बुज) गावात वास्तव्याला असलेले युवा कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांची “महात्मा ज्योतिबा फुले” पुरस्काराकरिता नुकतीच निवड झाली आहे. लेखक/कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे हे अत्यंत गरिब कुटूंंबात जन्माला आले. शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा देत असत. अशातच आसाम रायफल चा इंटरव्ह्यू काल पोष्टाने आला आणि तेव्हा जन्मदात्या वडिलाने घरात भांडण घालून अंगुलिमाल चा तो इंटरव्ह्यू काल जाळून टाकला आणि अंगुलिमाल उराडे यांना जिवनात उध्वस्त केलं.

वडिलाने सण २०११ मध्ये आई, दोन ताई, अंगुलिमाल यांना घराबाहेर हाकलून लावलं. अगदी तेव्हापासूनच आईने दोन मुलींना व अंगुलिमाल ला घेऊन सावली तालुक्यातील जांब (बुज) गावी माहेराला आनुन मुलांच सांभाळ केला….. अंगुलिमाल उराडे जिवनात न खचता…. झालं गेलं सर्व विसरून…. आई, दोन बहिणींना सोबत घेऊन आनंदाने जिवन जगू लागला. कॉलेज करता करता…. मनी साहित्याची गोडी निर्माण लागली आणि साहित्य क्षेत्रात उतरला….. कवी अंगुलिमाल उराडे यांनी सण २०१५ मध्ये आपल्याच जन्मदात्या वडीलांच्या सत्यघटनेवर आधारित “विषारी साप” नावाची विद्रोही कविता लिहून वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केली. आणि ह्याच “विषारी साप” कवितेने कवी. अंगुलिमाल मायाबाई उराडे यांची महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. अगदी तेव्हापासूनच साहित्य लिखाणाला गती/चालना मिळाली. कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे हे कविता, लेख, चारोळीच्या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्रात समाज जागृती करीत असतात.

ओळखी असो वा अनोळखी…. वेळोवेळी मद्दतीला धावुन जाणे. हे त्यांचे काम. त्यांच्यामध्ये समाजसेवेची धडपड आणि कळकळ….. अनेक कवी संमेलनामध्ये त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून ज्वलंत विषयांना हाताळून वाचा फोडीत असतात. ह्याच त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे यांना आतापर्यंत काव्य गौरव, कवी रत्न, जिवन गौरव, समाज सेवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उत्कृष्ट साहित्यिक, युवा भूषण, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिवन गौरव, द बेस्ट स्टोरी रायटर्स, समाजरत्न, साहित्य गौरव अशा विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ह्या कार्याची योग्य ती दखल घेऊन “कला फाऊंडेशन” पिंपळोद, ह्या संस्थेच्या वतीने युवा साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे यांची यावर्षीच्या *महात्मा ज्योतिबा फुले* पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे “कला फाऊंडेशन” पिंपळोद, संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष हास्यसम्राट प्रशांत दामले साहेब यांनी आजच निवडपत्राकाद्वारे कळवीले आहे. “महात्मा ज्योतिबा फुले” पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच, जिवलग मित्रांच्या वतीने व बेंबाळ / जांब (बुज) ह्या दोन्ही गावातील नागरिकांनी युवा कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांचे भरभरून कौतुक केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here